सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, विखे पाटील काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर सुप्रिया सुळे आणि पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची संयुक्तपणे नियुक्ती जाहीर केली आहे.पवारांच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मोठे फेरबदल केले आहेत. शरद पवार यांनी पुन्हा धक्कातंत्र वापरत दिल्ली येथे पक्षाच्या बैठकीत पुन्हा भाकरी फिरवली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर त्यांची कन्या सुप्रिया सुळे आणि पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची संयुक्तपणे नियुक्ती जाहीर केली आहे.पवारांच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “जाऊ द्या आता त्यांनी भाकरी फिरवलीय, पुष्कळ झाला विषय.मात्र भाकरी करपली की नाही ते मला माहीत नाही”, असं विखे पाटील म्हणाले.
Published on: Jun 12, 2023 10:19 AM