उद्धव ठाकरे सभा घेणार यात काय नवीन? आनंद फक्त याच गोष्टीचा की…; राधाकृष्ण विखे पाटील यांचं टीकास्त्र

| Updated on: Mar 05, 2023 | 2:24 PM

Radhakrishna Vikhe Patil on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तो एक बदल झालाय. याचा आनंद आहे, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी आजच्या ठाकरेगटाच्या सभेवर खोचक टीका केली आहे. पाहा...

सोलापूर : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेवर खोचक टीका केली आहे. “राजकीय पक्षांच्या सभा होतच राहतात. उद्धव ठाकरे पक्षाचे नेते असल्याने सभा घेणार त्यात काहीही वेगळं नाही. मात्र आनंद एवढाच आहे की उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आहेत. आता फेसबुकवर नाही. तर प्रत्यक्ष सभा घेत आहेत. आता त्यांची थेट सभा होतेय. लोकांना तो एक बदल दिसतोय”, असं विखे पाटील म्हणाले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीतील खेडमध्ये संध्याकाळी सहा वाजता जाहीर सभा होणार आहे.

Published on: Mar 05, 2023 02:23 PM
आमदार जरी एकनाथ शिंदेंसोबत गेले असले तरी शिवसैनिक उद्धव ठाकरेंबरोबरच; ‘या’ नेत्याला विश्वास
ज्यांनी चूक केली असेल तर… , देवेंद्र फडणवीस यांची काय दिला सूचक इशारा