“संजय राऊत मालकाला खुश करण्यासाठी स्फोटक विधानं करतात”, ‘त्या’ आरोपांनंतर विखे पाटील भडकले!

| Updated on: Jun 15, 2023 | 9:59 AM

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर मोठा अरोप केला आहे. झाकीर नाईककडून विखे-पाटील यांच्या संस्थेला 4 ते 5 कोटी रुपये देण्यात आल्याचा संशय राऊतांनी व्यक्त केला आहे. इतकच नाही तर याबाबत आपल्याकडे पुरावे असून तेही लवकरच बाहेर काढू असा इशारा त्यांनी दिला आहे.

अहमदनगर : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर मोठा अरोप केला आहे. झाकीर नाईककडून विखे-पाटील यांच्या संस्थेला 4 ते 5 कोटी रुपये देण्यात आल्याचा संशय राऊतांनी व्यक्त केला आहे. इतकच नाही तर याबाबत आपल्याकडे पुरावे असून तेही लवकरच बाहेर काढू असा इशारा त्यांनी दिला आहे. यावरून विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “संजय राऊत यांचा मानसिक संतुलन बिघडलं आहे. आधारहीन आरोप करण्याची त्यांची सवय आहे.त्यांच्याकडे पुरावे असतील, तर त्यांनी कुठेही द्यावे आम्ही चौकशीला घाबरणारे नाही.स्फोटक विधान करून लोकप्रियता मिळवण्याची राऊत यांची धडपड आहे. आपल्या मालकाला खुश करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. सिल्व्हर ओकला जाऊन ते रोज नमाज पढतात आम्ही कधी काही बोललो का? त्यांना सुपाऱ्या दिल्या जातात आणि भाकरीपुरतं हे काम करतात.यापूर्वी सुद्धा हा आरोप झाला होता आणि त्याची चौकशी सुद्धा झाली.केंद्रीय यंत्रणेने त्याची चौकशी करून हा विषय क्लोज केलाय”, असं विखे पाटील म्हणाले.

Published on: Jun 15, 2023 09:59 AM
‘कोणीतरी डोळे वटारल्याने नवी जाहिरात आली’; जयंत पाटील यांची शिंदे गटावर खरमरीत टीका
जाहिरातीच्या वादानंतर शिंदे-फडणवीस लागले कामाला! एकत्र येणार येथील कार्यक्रमात