“सिल्व्हर ओकवर जाऊन संजय राऊत नमाज पडतात का?”, कोणी केली टीका?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शाह यांच्यासोबत राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केली. शिंदे-फडणवीस यांच्या दिल्लीवारीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शाह यांच्यासोबत राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केली. शिंदे-फडणवीस यांच्या दिल्लीवारीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती.”देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले समजू शकतो. त्यांची मक्का मदिना दिल्लीत आहे. तुमचं दिल्लीत काय आहे? तुम्ही दिल्लीत मुजरा का करता? बाळासाहेब ठाकरे विस्तारासाठी कधी दिल्लीत जायचे काय? असा सवाल संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना केला. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आमचे नेते दिल्लीत आहेत, त्यांना भेटणं काही गैर नाही. मग संजय राऊत काय सिल्व्हर ओकला जाऊन नमाज पडतात का ? राऊतांनी बोलताना तारतम्य बाळगल पाहिजे, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे”, असं विखे पाटील म्हणाले.