जेव्हा राधाकृष्ण विखे पाटील चक्क सभागृहात गाढ झोपतात; पाहा अखेर शिपायाला काय करावं लागलं…
काल विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपलं. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक होताना दिसले, विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान काल विधान परिषदेत एक वेगळाच प्रकार घडला.
मुंबई, 5 ऑगस्ट 2023 | काल विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपलं. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक होताना दिसले, विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान काल विधान परिषदेत एक वेगळाच प्रकार घडला. विधीमंडळाचा विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृह नेते एकनाथ खडसे यांचे भाषण संपले. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाचा विधेयक मांडण्यासाठी पुकारा केला. पण, त्यावेळी विखे पाटील गाढ झोपेत होते. नीलम गोऱ्हे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना दोनवेळा आवाज दिला. त्याचवेळी एका आमदाराने मोठ्याने विखे पाटील साहेब अशी हाकही मारली. त्यानंतर जागे झालेल्या विखे पाटील यांनी आपल्या विभागाचे विधेयक मांडले.
Published on: Aug 05, 2023 08:46 AM