‘माफी मागण्यासारखं काही कृत्य केललं नाही, त्यामुळे स्थगिती द्या’; राहुल गांधी याचं सर्वोच्च न्यायालयात उत्तर

| Updated on: Aug 03, 2023 | 8:07 AM

राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत शिक्षेविरोधात याचिका दाखल केली होती. तर न्यायालयाने दिलेली २ वर्षांची शिक्षा सुनावली होती.

नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2023 | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. यामुळे आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत शिक्षेविरोधात याचिका दाखल केली होती. तर न्यायालयाने दिलेली २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यांना मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्यावरून ही शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी आपली बाजू मांडताना, माफी मागण्यासारखं काही कृत्य केललं नाही, त्यामुळे गुजरात उच्च न्यायालयाने सुनावलेल्या निर्णयाला स्थगिती द्या अशी मागणी करताना उत्तर दाखल केलं आहे. याच्याआधी राहूल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार देताना उच्च न्यायालयाने दाखल केलेली याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Published on: Aug 03, 2023 08:07 AM
देवेंद्र फडणवीस म्हणाले, होय संभाजी भिडे ‘गुरुजी’ वाटतात; सभागृहात गदारोळ, पाहा स्पेशल रिपोर्ट…
“देवेंद्र फडणवीस संभाजी भिडे यांना ‘गुरुजी’ म्हणत असतील तर…”, उद्धव ठाकरे यांचा टोला; म्हणाले….