तिकीट न मिळाल्याने काँग्रेस नेत्याची नाराजी, राहुल गांधी यांचा एक फोन अन्…

| Updated on: Feb 09, 2023 | 3:48 PM

कसबा पोटनिवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर बाळासाहेब दाभेकर यांना थेट राहुल गांधींनी फोन केला. मग पुढे काय घडलं पाहा...

मुंबई : कसबा पोटनिवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर बाळासाहेब दाभेकर यांना थेट राहुल गांधींनी फोन केला. या फोननंतर दाभेकर यांनी आपली निर्णय बदलला आहे. राहुल गांधींचा फोन आल्यानंतर मी माघार घेतली आहे. माझी अनेकांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुल गांधींच्या फोननंतर मी तयार झालो. मला उमेदवारी नाकारल्यानंतर मी बंडखोरी केली होती. मात्र आता माझ्या मनात कोणतीही नाराजी राहिली नाही, असं दाभेकर म्हणाले.तसंच बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज देखील मागे घेतला आहे.

Published on: Feb 09, 2023 03:48 PM
आधीच अडचणीत सापडलेल्या अदानी ग्रुपकडे मुंबईतील महत्वाचा प्रकल्प; मनसेचा राज्य सरकारला सवाल
अन् शिंदे सरकार पडेल; कुणी आणि का केलाय दावा? पाहा…