अदानी आणि नरेंद्र मोदींचे फोटो दाखवत राहुल गांधींनी विचारलं, ये रिश्ता क्या कहलाता है?

| Updated on: Feb 07, 2023 | 3:33 PM

भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण केलं. यावेळी ते विविध मुद्द्यांवर बोलले. पाहा...

नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण केलं. यावेळी ते विविध मुद्द्यांवर बोलले. गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो दाखवत विचारलं, “ये रिश्ता क्या कहलाता है?”, असं सवाल त्यांनी विचारला. अदानींसाठी नरेंद्र मोदी यांनी नियम बदलले. नियम बदलून अदानींना 6 एअरपोर्टची मालकी दिली गेली, असं म्हणत राहुल गांधी यांची नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

Published on: Feb 07, 2023 03:33 PM
जितेंद्र आव्हाड यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
भारत जोडो यात्रेतून काय शिकले? राहुल गांधी यांनी लोकसभेत सांगितलं…