कसबा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने उमेदवारी अर्ज भरणार, बावनकुळेंसह नेत्या-कार्यकर्त्यांची उपस्थिती

| Updated on: Feb 06, 2023 | 9:41 AM

कसबा पेठ पोटनिवडणूकीसाठी भाजप उमेदवार हेमंत रासने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पाहा...

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार हेमंत रासने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. कसबा गणपतीचं दर्शन घेऊन रासने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मार्गस्थ होतील. पुण्यातील भाजपचे नेते आणि कार्यकर्ते रासनेंबरोबर असतील. यावेळी मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. थोड्याच वेळात कसबा गणपतीजवळ भाजप कार्यकर्ते जमतील आणि मग या शक्ती प्रदर्शनाला सुरुवात होईल.

Published on: Feb 06, 2023 09:41 AM
मला ‘लव्ह’चा अर्थ… सुप्रिया सुळे म्हणाल्या आणि नितेश राणे यांनी व्यक्त केली भेटण्याची इच्छा, कारण काय?
वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचा सवाल; ‘मुघलांशिवाय शिवरायांचा इतिहास कसा ते समजावून सांगा?’