राहुल गांधी यांची लडाखच्या रस्त्यावर स्पोर्ट्स बाईकची राईड; फोटो सोशल मिडियावर व्हायरल

| Updated on: Aug 20, 2023 | 9:38 AM

आगामी लोकसभा निवडणूक आणि दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी सध्या लेह, लडाख आणि कारगिलच्या दौऱ्यावर आहेत. मात्र यावेळी ते लडाखच्या रस्त्यावर स्पोर्ट्स बाईक चालवताना दिसले.

श्रीनगर : 20 ऑगस्ट 2023 | आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्याने भाजपसह काँग्रेसने कंबर कसली आहे. तर देशभरात सध्या दोन्ही पक्षाकडून मोर्चे बांधणीला वेग आला आहे. तसचे एनडीएसह इंडिया आघाडीच्या बैठकांना जोर आला आहे. याच दरम्यान राहुल गांधी हे लेह, लडाख आणि कारगिलच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मात्र ते विमान, हेलिकॉप्टर किंवा ट्रकने प्रवार करत नसून त्यांनी स्पोर्ट्स बाईक चालवली आहे. राहुल यांचे हे फोटो सध्या सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तर यावेळी राहुल गांधी यांनी त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त लेह येथील पॅंगॉन्ग तलावावर आदरांजली वाहिली. तर राहुल यांचा हा दौरा पुढील महिन्यात कारगिलमध्ये हिल कौन्सिलच्या निवडणुकांसाठी महत्वाचा मानला जात आहे.

Published on: Aug 20, 2023 09:38 AM
निधीवरुन खासदार कोल्हे यांचे अजित पवार यांच्यावर टीकास्त्र
‘अजित पवार यांनी पदे सोडून स्वत:च्या नव्या संस्था निर्माण कारव्यात’; सामनाच्या रोखठोकमधून राऊत यांचा टोला