नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
राज्यात निवडणूकीची धामधुमी सुरु असतानाच सहा नोव्हेंबरला नागपूरात संविधान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला कॉंग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.
येत्या सहा नोव्हेंबरला नागपूरात संविधान संमेलन होणार आहे. या संमेलनाला कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाचे आयोजन ओबीसी युवा अधिकार मंच या संघटनेने केलेले आहे. या संदर्भात राहुल गांधी यांनी सातत्याने जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली आहे. ओबीसीचा जनगणना न झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. आम्ही धुळ्याला राहुल गांधी यांना भेटायला गेलेलो होतो. भारत जोडो दरम्यान 13 मार्च रोजी आम्ही राहुल गांधी यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांना विर्दभात येण्याचे आमंत्रण दिले होते असे ओबीसी युवा अधिकार मंचाचे संयोजक उमेश कोरम यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी आमचे आमंत्रण स्वीकारले याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानत आहोत असेही उमेश कोरम यांनी म्हटले आहे.
Published on: Nov 03, 2024 05:30 PM