Video | ठाण्याच्या जांभळीनाका येथे या तारखेला राहुल गांधी यांची न्याययात्रा प्रवेश करणार

| Updated on: Mar 02, 2024 | 2:24 PM

महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये मोठे भूकंप झाल्यानंतर दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिट्टी दिल्यानंतर आता राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याययात्रा' अखेर येत्या 12 मार्चला महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. यानंतर ठाण्यातील जांभळीनाका या शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधी यांची 16 मार्च रोजी सभा होणार आहे.

ठाणे | 2 मार्च 2024 : कॉंग्रेसचे नांदेडचे दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर कॉंग्रेसचीही अवस्था शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सारखीच झाली आहे. याआधी कॉंग्रेसच्या निष्ठावान घराण्यातील मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेसला सोडचिट्टी देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आमदार बाबा सिद्दीकी यांनी कॉंग्रेसला सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी सध्या कॉंग्रेसमध्येच रहाण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसमध्ये झालेल्या या भूकंपानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याययात्रा’ महाराष्ट्रात 12 मार्चला नंदूरबार येथे प्रवेश करणार आहे. यानंतर राहुल गांधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गड असलेल्या टेंभीनाकापासून जवळ असलेल्या जांभळी नाका येथे 16 मार्चला सकाळी पोहचणार आहेत. राहुल गांधी यांच्या सभेला उद्धव ठाकरे यांना आमंत्रण दिल्याचे कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 02, 2024 02:22 PM
Pune Metro : रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो या तारखेपासुन सुरु होणार
video | ‘धर्मांतरानंतरही आदिवासींचे आरक्षण लाटल्याची घटना उघड, तर गुन्हे दाखल करु…,’ लोढा यांनी स्पष्टच सांगितले