उमेदवारी नेमकी कशासाठी हवी आहे? राहुल कलाटे यांनी कारण सांगितलं…
राष्ट्रवादीने नाना काटे यांना पिंपरी चिंचवडमधून उमेदवारी दिली त्यानंतर राहुल कलाटे यांनी वेगळी वाट धरली. त्याबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. पाहा...
पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादीने नाना काटे यांना पिंपरी चिंचवडमधून उमेदवारी दिली त्यानंतर राहुल कलाटे यांनी वेगळी वाट धरली. त्याबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. “मी अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. सुनील शेळकेंना लोकनेता का म्हणतात मला काही कळालं नाही. कारण त्यांना इथल्या जनतेच्या भावनाच कळाल्या नाहीत. मी या मतदारसंघात कोरोना काळात काम केलंय. 24 तास मी उपलब्ध असतो. यावर जनता माझ्यामागे आहे, ते तुम्हाला दिसेल. माझं नावं कसं मागे पडलं हे नेत्यांनाच विचारा. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला निवडणूक लढवायची आहे, असं राहुल कलाटे म्हणालेत.
Published on: Feb 07, 2023 04:09 PM