Rahul Narvekar | कुणाच्याही बाजूने नाही, मी अध्यक्ष म्हणून योग्य तो निर्णय देणार
आज विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. सभागृहाचं काम व्यवस्थित चालेल. सभागृहाचं कामकाज संविधानात दिलेल्या तरतूदीनुसार असतात. असे प्रश्न उपस्थित करून संविधानाचा अपमान करण्यात येतोय.
आज विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. सभागृहाचं काम व्यवस्थित चालेल. सभागृहाचं कामकाज संविधानात दिलेल्या तरतूदीनुसार असतात. असे प्रश्न उपस्थित करून संविधानाचा अपमान करण्यात येतोय. मी घेतलेला किंवा सभागृहाचा निर्णय हा कायद्याच्या अखात्यारीत आहे. ज्युडीशरीचा पर्याय आहेच. यापुर्वीही असे निर्णय झालेत. जनता हे सरकार पाच वर्षांसाठी निवडून देते. 2024 मध्ये निवडणुका आहेत. मला आजची फ्लोरची परिस्थिती पाहून वाटत नाही की परिस्थिती ठिक नाही आहे. सगळं ठिक आहे. मी कुणाचेया बाजूने निर्णय देत नाही, योग्य तो निर्णय अध्यक्ष म्हणून देतो. आज दिवसभरात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता अधिक आहे. भाजप आणि शिंदे गटाची खरी चाचपणी आज पाहायला मिळेल. मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातलं राजकारण अधिक तापलं आहे.
Published on: Jul 04, 2022 10:52 AM