Rahul Shewale : पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात युतीबाबत एक तास चर्चा झाली होती, राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट

| Updated on: Jul 19, 2022 | 9:39 PM

शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल शेवाळे यांनी केला आहे. ते नवी दिल्लीत बोलत होते.

शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल शेवाळे यांनी केला आहे. ते नवी दिल्लीत बोलत होते. याची सविस्तर माहिती देताना राहुल शेवाळे म्हणाले, की 1 जून रोजी आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं पक्षासोबत राहू. पण तेव्हा आम्ही सांगितलं भाजपासोबत निवडणूक लढवली आहे. आम्हाला त्रास होतोय. शिंदे मुख्यमंत्री झाले तर मी त्या भूमिकेचं स्वागत करेल, असे ते म्हणाले. त्यावेळी संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत उपस्थित होते. त्या सर्वांच्या समोर उद्धव ठाकरे म्हणाले, की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. भाजपाने तो निर्णय घेतला, तर मी स्वागत करेल असे सांगितले. त्याचे आम्ही स्वागत केले, असंही शेवाळे म्हणाले.

Published on: Jul 19, 2022 09:39 PM
प्रलोभनांवर आम्ही कुत्र्यासारखी टांग वर करुन दाखवतो
Uddhav Thackeray : शिवसेनेला केंद्रातही मोठा झटका, 12 खासदार शिंदे गटात सहभागी, ठाकरेंच्या शिवसेनेचं नेमकं काय होणार?