‘तोपर्यंत मी गडाच्या खाली येणार नाही’, शिवभक्तांना छ्त्रपती संभाजीराजे यांचे असे का म्हणाले?
पोलिसांच्या म्हणण्यानुसार जवळपास अडीच लाख शिवभक्त हे गडावर दाखल झाले आहेत. तर अजून 15 हजार शिवभक्त गड चढत आहेत. त्यामुळे गडावर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकरता जवळपास 50 एक हजार शिवभक्तांना गडाच्या पायथ्याला थांबविण्यात आलं आहे.
रायगड : रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला यंदा रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार जवळपास अडीच लाख शिवभक्त हे गडावर दाखल झाले आहेत. तर अजून 15 हजार शिवभक्त गड चढत आहेत. त्यामुळे गडावर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकरता जवळपास 50 एक हजार शिवभक्तांना गडाच्या पायथ्याला थांबविण्यात आलं आहे. त्यामुळे माजी खासदार छ्त्रपती संभाजीराजे यांनी शिवभक्तांना आवाहन केलं आहे. त्यांनी, मी शिवभक्तांना आवाहन करू इच्छितो की, जिथे शिवभक्त आले आहेत तिथे त्यांनी थांबून घ्यावं. गडाची कॅपिसिटी संपलेली आहे. मी स्वतः गडावर येणार आहे आणि सर्व शिवभक्तांना जो दर्शन होणार नाही तोपर्यंत मी गडाच्या खाली येणार नाही हा माझा शब्द आहे.
Published on: Jun 06, 2023 09:20 AM