Raigad Suspected Boat | बोटीवरील बॉक्समध्ये आढळलेल्या 3 AK-47 बंदुका-tv9

| Updated on: Aug 19, 2022 | 9:40 AM

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे तीन संशयित बोटींचा तपास स्थानिक पोलिस प्रशासन आणि एटीएस करत आहे. दरम्यान बोटीवर 3 AK-47 बंदुका असणारा बॉक्स एटीएस कडून जप्त करण्यात आलेला आहे.

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे तीन संशयित बोटी सापडल्या होत्या. त्यामध्ये 3 AK-47 बंदुका, लाईफ गार्ड आणि काही काडतुसे मिळाली होती. त्यानंतर हे प्रकरण थेट अधिवेशनात देखिल गाजले. यानंतर या गोष्टीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्याचा तपास स्थानिक पोलिस प्रशासन आणि एटीएस करत आहे. दरम्यान बोटीवर 3 AK-47 बंदुका असणारा बॉक्स एटीएस कडून जप्त करण्यात आलेला आहे. तसेच संशयस्पद सापडलेल्या बोटींचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीम ही रायगडला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

Published on: Aug 19, 2022 09:40 AM
Shivsena Political Crisis | कोकणातील एक आमदार शिंदे गटात सामील होणार?-tv9
Krishna Janmashtami | देशभरात गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा उत्साह-tv9