खोपोली बस अपघातानंतर दुर्घटनास्थळी लोखंडी ग्रील बसवायच्या कामाला सुरुवात
Khopoli Bus Accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बोरघाटात बस दरीत कोसळली; दुर्घटनास्थळी कामाला वेग. पाहा व्हीडिओ...
खोपोली,रायगड : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बोरघाटाजवळ दरीत बस कोसळली. या अपघातात अनेकजण जखमी झाले तर 13 जणांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या ठिकाणी लोखंडी ग्रील बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झालंय. आता बसवले जाणारे हे ग्रील आधीपासूनच इथं असते तर कदाचित आज हा दिवस बाजीप्रभू ढोल ताशा पथकावर आला नसता, अशी भावना व्यक्त होतेय. ते 13 कलाकार आज या जगात असते. हाच मुद्दा काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर त्यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर चोवीस तासांच्या आत झोपी गेलेल्या यंत्रणेला जाग आली अन इथं लोखंडी ग्रील बसवण्याच्या कामाला वेग आलाय.