मुंबईसह कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा; पुन्हा मुसळधार

| Updated on: Sep 14, 2022 | 10:22 AM

आज, उद्या राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने राज्यातील अनेक भागात थैमान घातले आहे. त्यामुळे मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि नाशिकमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सध्याच्या पावसाने महाराष्ट्रभर थैमान घातले असले तरी आज आणि उद्याही मुंबईसह रत्नागिर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सलग दोन दिवस पावसाचे प्रमाण वाढणार असून किनारपट्टी आणि नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आज, उद्या राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

एपीएमसी प्रकरणी अब्दुल सत्तारांना न्यायालयाचा दणका
अनिल देशमुखांवरील खटला चालविण्यास सीबीआयला संमती