दादर रेल्वे स्थानकाजवळ दोन रेल्वे एकमेकांवर आदळल्या, सर्व प्रवासी सुखरूप
दादर-पॉन्डिचेरी या लांब पल्ल्याच्या गाडीचे मागचे तीन डबे रेल्वे रुळावरुन घसरल्याची माहिती समोर येते आहे. आतापर्यंत यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्याचप्रमाणे कुणालाही दुखापत झाल्याचं वृत्त हाती आलेलं नाही.
दादर-पॉन्डिचेरी या लांब पल्ल्याच्या गाडीचे मागचे तीन डबे रेल्वे रुळावरुन घसरल्याची माहिती समोर येते आहे. आतापर्यंत यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्याचप्रमाणे कुणालाही दुखापत झाल्याचं वृत्त हाती आलेलं नाही. नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही घटना घडली. गाडी नंबर 11005 असा या गाडीचा नंबर आहे. दरम्यान, सुरुवातीला दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या इंजिनची टक्कर झाली. त्यानंतर हादरे बसल्यामुळे दोन्ही गाड्या जागच्या जागी थांबल्या होत्या. या घटनेनंतर मध्यरेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दादर माटुंगा स्थानकादरम्यान, हा सगळा प्रकार घडला. मध्य रेल्वेच्या दादर मार्गावर झालेल्या या घटनेमुळे आता दादर पॉन्डिचेरी या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय.