मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवा खोळंबली; कल्याण स्थानकात झालं असं काय?
पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे काल कुर्ला स्टेशन परिसरात पाणी साचलं होतं तर कुर्ला स्टेशन परिसरात पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील विस्कळीत झाली होती. तर हार्बर लाइन वडाळा ते मानखुर्द लोकल वाहतूक बंद करण्यात आली होती.
मुंबई : मुंबईत जोरदार पावसामुळे मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकल सेवेला फटका बसला आहे. पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे काल कुर्ला स्टेशन परिसरात पाणी साचलं होतं तर कुर्ला स्टेशन परिसरात पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील विस्कळीत झाली होती. तर हार्बर लाइन वडाळा ते मानखुर्द लोकल वाहतूक बंद करण्यात आली होती. ती वाहतूक सेवा सुरळीत होते न होते तोच आता पुन्हा एकदा मुंबई लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. या बिघाडामुळे मुंबईहून कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक उशिराने होत आहे. तर लोकल सेवा २० मिनिटं उशिराने होत आहे. ज्यामुळे प्रवाशांना त्यांचा नाहक त्रास सोसावा लागत आहे.
Published on: Jul 22, 2023 01:00 PM