राज्याला पावसाने झोडपले, चंद्रपुरात अंधारी नदीच्या पुरात अडलेल्याची सुटका
गेले तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. रत्नागिरीला रेड अलर्ट दिलेला आहे.विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भासह महाराष्ट्राला पावसाने अक्षरश:झोडपले आहे. चंद्रपूरातील अंधारी नदीतील पुरामुळे शेतात अडकलेल्या 25 गावकऱ्यांची सुटका रेस्क्यू ऑपरेशन राबवून अग्निशमन आणि पोलिसांनी केली आहे. या नदीचा प्रचंड पूर आल्याने हे गावकरी शेतात अडकले होते. दरम्यान, मुंबई आणि कोकणात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. या पावसाने आता मुंबईला पाणी पुरवठा करणारे तुळशी तलाव भरुन वाहू लागला आहे. कोकण मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाण तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊसाने जुलै महिन्याची सरासरी ओलांडली आहे. जून महीन्यात पावासाने उघडीप दिल्याने चिंता व्यक्त केली जात होती. परंतू जुलै महिन्यात पावसाने कसर भरून काढली आहे.
Published on: Jul 21, 2024 01:49 PM