नवी मुंबईत रिमझिम पावसाला सुरुवात
नवी मुंबईत आज पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे हवेत गारठा वाढल्याने नवी मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
नवी मुंबईत गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. आज अखेर रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. नव्या मुंबईत सकाळी पाच वाजेपासून रिमझिम पाऊस पडत आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. हवेत गारठा वाढल्याने नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे.