‘महिलेवर हात उगारणे ही महाराष्ट्राची संस्कृती…’ राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा कडाडल्या
मागच्या सरकारच्या काळात शक्ती कायदा मंजूर झाला. तो केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे, तो परित करणे ही priority आहे. जालना येथील घटना निंदनीय, निषेधार्थ असून यावर योग्य ती कारवाई होणं अपेक्षित आहे.
जळगाव : 2 सप्टेंबर 2023 | जालना येथे घडलेल्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. विविध पक्षांचे नेते मराठा समाजाच्या आंदोलकांची भेट घेत आहेत. पोलिसांच्या लाठीमारात काही महिलाही जखमी झाल्या आहेत. त्यावरून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे कडाडल्या आहेत. आदरणीय शरद पवार साहेब आणि इतर नेते यांनी माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे, त्यावर काम करण्याची गरज आहे. मागच्या सरकारच्या काळात शक्ती कायदा मंजूर झाला. तो केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे, तो परित करणे ही priority आहे. जालना येथील घटना निंदनीय, निषेधार्थ असून यावर योग्य ती कारवाई होणं अपेक्षित आहे. महिलेवर हात उगारणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.