राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांची धमकी, गुणरत्न सदावर्ते यांनी काय दिला इशारा

| Updated on: Oct 12, 2023 | 3:07 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. त्यानंतर आता मनसे कार्यकर्ते यांच्याकडून आपल्याला धमक्या येत आहेत असा आरोप त्यांनी केला. यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी सदावर्ते वेडा माणूस आहे त्याला उत्तर देणे योग्य वाटत नाही, असा टोला लगावलाय.

मुंबई : 10 ऑक्टोबर 2023 | राज ठाकरे तुम्हारी दादागिरी नही चलेगी असा इशारा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिलाय. तर सदावर्ते हा वेडा माणूस आहे त्याला घाबरण्याच कारण नाही असा पलटवार मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय. राज ठाकरेचे काही पिल्लू आहे मला सतत फोन करून धमकी देत आहे. महाराष्ट्रात मला फिरू देणार नाही आणि मी कोणालाही घाबरत नाही तुमच्या लोकांच्या धमक्याला भीक घालत नाही. मनसे कार्यकर्ते यांच्याकडून मला धमक्या आल्या आहेत. पण मी त्याला घाबरणार नाही. मी परळ, लालबागमध्ये राहतो त्यामुळे तुमच्या धमक्यांना भिक घालत नाही असे ते म्हणाले. एसटी कामगार संचालक मंडळाने मंत्री उदय सावंत यांची भेट घेतली. महागाई भत्ता आणि दिवाली बोनस या संदर्भात चर्चा झाली. दीपावली बोनस यावेळी जास्त मिळावा अशी मागणी केली आहे असे त्यांनी सांगितले.

Published on: Oct 10, 2023 11:58 PM
वसंत तात्यांना लाल दिव्याची गाडी भेट. दिव्याचं काय केलं? वसंत मोरे म्हणाले…
Saamana | देणाऱ्यांनाच हुकूमशहा ठरवलं, सामानातून शिंदे गट अन् अजितदादा गटावर सडकून टीका