“रिल्सस्टारमुळे राजकारणातल्या घडामोडींवर जनता दुर्लक्ष करतेय”, पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले…
मनसेच्या वतीने काल महाराष्ट्र नवनिर्माण रिलबाज पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी रिल्सच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम करणाऱ्या कलाकारांचं सत्कार करण्यात आलं. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते.
मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | मनसेच्या वतीने काल महाराष्ट्र नवनिर्माण रिलबाज पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी रिल्सच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम करणाऱ्या कलाकारांचं सत्कार करण्यात आलं. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्व मराठी रिल्सस्टारशी गप्पा मारल्या. ते म्हणाले की, तुम्ही लोक नसतात, जर या गोष्टी नसत्या तर देशात अराजक आले असते. आजची महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती याकडे दुर्लक्ष फक्त तुमच्यामुळे होते. समाज शांत बसला, यामध्ये सर्वस्व जबाबदार तुम्ही आहात.कारण म्हणजे तुम्ही लोक आहात. कारण तुमचा भंकसपणा त्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे तुमच्या माध्यमाचा उपयोग हा महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयुक्त ठरावा. महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे लक्ष देईल, याकडे देखील तुम्ही लक्ष घालाल, अशी अपेक्षा आहे.”
Published on: Aug 02, 2023 08:00 AM