“मतदानावेळी लोक कुठे जातात?” :राज ठाकरे यांनी मतदारांवर व्यक्त केली खंत

| Updated on: Jun 12, 2023 | 7:53 AM

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदारांवर खंत व्यक्त केली आहे. मुंबईत पार पडलेल्या साधन सुविधा विभागाच्या वर्धापन दिनी बोलत होते. मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी रायगडावर गेलो होतो. गडावरून खाली आलो तेव्हा गाडीमध्ये बसताना चार-पाचजण आले.

मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदारांवर खंत व्यक्त केली आहे. मुंबईत पार पडलेल्या साधन सुविधा विभागाच्या वर्धापन दिनी बोलत होते. “मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी रायगडावर गेलो होतो. गडावरून खाली आलो तेव्हा गाडीमध्ये बसताना चार-पाचजण आले. त्यांनी चिपळूनवरून आल्याचं सांगितलं. गेल्यावर्षी कोकणात पुरामध्ये नुकसान झालं तेव्हा केवळ मनसेचे कार्यकर्ते मदतीला धावले, इतर कुणीही नाही, असं त्यांनी सांगितलं. बरं झालं भेटलात, कधीतरी आभार मानायचे होते. ते आज मानून टाकतो असं ते म्हटले”, हा किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला. पण पुढे ते म्हणाले की, “सगळ्या प्रसंगात आपण सगळीकडे धावून जातो. सगळीकडे लोक आपल्याकडे प्रश्न घेऊन येतात. मला प्रश्न पडतो, हे मतदानाच्यावेळी कुठे जातात. नाशिकला मला अनेक शेतकरी बांधव भेटायला आले. ते मला अनेक प्रश्न सांगत होते. मी त्यांना त्यांच्या भागातील आमदार, खासदार कोण विचारलं, जिल्हा परिषद कुणाच्या ताब्यात आहे विचारलं. त्यांनी या या पक्षाची असल्याचं सांगितलं. त्यावर जे पिळवणूक करतात त्यांच्याच हातात सत्ता देणार असाल, तर मग माझ्याकडे येता कशाला, असं मी विचारलं”, असंही राज ठाकरे म्हणाले.

Published on: Jun 12, 2023 07:53 AM
VIDEO | कोकणातील पर्यटनाचे हॉटस्पॉट असणाऱ्या समुद्र किनाऱ्याला बिपरजॉयचा फटका; पर्यटक जखमी
‘शरद पवार यांनी भाकरी फिरवली नाही तर…’, ‘समाना’तून नेमका काय साधला निशाणा?