Raj Thackeray Aurangabad Live : राज ठाकरेंच्या सभेचं नाव काढताच पुतणे आदित्य ठाकरे म्हणतात बाकीचं जाऊद्या….
या सभेबाबत शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी मात्र यावर बोलणं टाळलं आहे. आदित्य ठाकरे आजच्या महाराष्ट्र दिनाबाबत बोलत होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना या सभेबाबत विचारलं. त्यावेळी त्यानी...बाकीचं जाऊद्या...म्हणत निघून गेले.
मुंबई : आजचा दिवस हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून तर साजरा होतच आहे. मात्र आजचा दिवस काही राजकीय सभांनीही जोरदार गाजत आहे. सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वापासून ते राणा कुटुंबियांपर्यंत सर्व मुद्द्यावर मोकळेपणे भाष्य केले आहे. तसेच त्यांनी भोंगेही काढण्याचा आदेश केंद्राने द्यावा म्हणत हा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलला आहे. तर सायंकाळी औरंगाबादेत तिकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडत आहे. या सभेवरूनही जोरदार घमासान सुरू आहे. शिवसेना नेत्यांकडून या सभेवर सडकून टीका होत आहे. या सभेबाबत शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी मात्र यावर बोलणं टाळलं आहे. आदित्य ठाकरे आजच्या महाराष्ट्र दिनाबाबत बोलत होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना या सभेबाबत विचारलं. त्यावेळी त्यानी…बाकीचं जाऊद्या…म्हणत निघून गेले.