Sandeep Deshpande on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या मेमरी कार्डमधली मेमरी डिलीट झाली आहे

| Updated on: Apr 30, 2022 | 12:00 PM

मुख्यमंत्र्यांची मेमरी इरेज झाल्याची टीका त्यांनी केली आहे. जेव्हा उद्धव ठाकरे फोटोग्राफीमध्ये मशगुल होते तेव्हा राज साहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज्यभर दौरे करून शिवसेना वाढवण्याचे काम करत होते.

मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. बाबरी पडली तेव्हा राज ठाकरे (Raj Thackeray) कुठे होते? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. यावर आता संदीप देशपांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांची मेमरी इरेज झाल्याची टीका त्यांनी केली आहे. जेव्हा उद्धव ठाकरे फोटोग्राफीमध्ये मशगुल होते तेव्हा राज साहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज्यभर दौरे करून शिवसेना वाढवण्याचे काम करत होते. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांना विनंती केली म्हणून उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाले हे उद्धव ठाकरे यांनी विसरू नये असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. आता संदीप देशपांडे यांच्या टीकेला शिवसेना काय प्रत्युत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Raj Thackeray Aurangabad Sabha | थोड्याच वेळात Amit Thackeray सभास्थळी पोहोचणार
VIDEO | TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 30 April 2022