Kishori Pednekar : राज ठाकरे हे कुठेही जाऊ शकतात, भाजप-मनसे युतीच्या चर्चेवरुन शिवसेनेचा हल्लाबोल..!

| Updated on: Sep 03, 2022 | 7:01 PM

आगामी मुंबई महापालिका निवडणूकीत शिवसेना ही 150 जागांवर विजय खेचणार असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी कोणतीही भूमिका घेतली तरी शिवसैनिक आणि मतदर हे पक्षाबरोबरच असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले आहे, त्या tv9 मराठीच्या कार्यालयातील बाप्पाच्या दर्शनासाठी आल्या होत्या.

मुंबई :  (BJP-MNS) भाजप-मनसेच्या युतीची चर्चा सुरु झाल्यापासून (Shiv sena) शिवसेनेच्या गोठातून आता भाजप आणि मनसेवर आरोप होऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठींमध्ये वाढ झाली आहे. त्यावरुन आता हे राजकारण सुरु झाले आहे. राज ठाकरे हे शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडून ते कुठेही जाऊ शकतात असा टोला (Kishori Pednekar) किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. तर आगामी मुंबई महापालिका निवडणूकीत शिवसेना ही 150 जागांवर विजय खेचणार असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी कोणतीही भूमिका घेतली तरी शिवसैनिक आणि मतदर हे पक्षाबरोबरच असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले आहे, त्या tv9 मराठीच्या कार्यालयातील बाप्पाच्या दर्शनासाठी आल्या होत्या.

Published on: Sep 03, 2022 07:01 PM
Devendra Fadnvis : अमित शाह यांचा दौरा नियोजित, राज ठाकरे अन् अमित शाह यांच्या भेटीवर काय म्हणाले फडणवीस?
Ajit Pawar : जनता कुणाच्या मागे लवकरच कळेल, अजित पवारांचे दसरा मेळाव्यावरुन वक्तव्य