‘मी तेव्हाच सांगितलं होतं, पण’ ; अजित पवार यांचा सत्तेतील प्रवेशावर राज ठाकरे यांची टीका
त्यांच्यात चर्चा ही झाली. तर त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ही उपस्थित होते. त्यावरून आता राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. यावरूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेने प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केलीय.
पुणे, 14 ऑगस्ट 2023 | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यात गुप्त भेट घेतली. त्यांच्यात चर्चा ही झाली. तर त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ही उपस्थित होते. त्यावरून आता राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. यावरूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेने प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केलीय. त्यांनी, मी सांगितलं होतं ना? पण माझं ऐकतयं कोण? हे त्यांचंच आहे ते. एक टीम अगोदर पाठवली. आता दुसरी जाईल. हे सगळे आता एकमेकांना मिळालेले आहेत. हे काय आज नाही तर २०१४ पासून. तुम्हाला आठवत नाही का पहाटेचा शपथविधी. तर आता शरद पवार आणि अजित पवार यांना भेटायची जागा चोरडिया याठिकाणी मिळाली का असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
Published on: Aug 14, 2023 02:18 PM