Raj Thackeray : राज ठाकरे यांचा जालन्यातील उपोषणकर्त्यांसोबत संवाद, बाळा नांदगावकर यांनी सांगितलं
स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९२३ साली मराठ्यांना आरक्षण होतं. ते आता का नाही. मराठ्यांनी कोणतं पाप केलं, असंही नांदगावकर म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जरांगे यांच्याशी चर्चा केली.
जालना, ३ सप्टेंबर २०२३ : मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे जालना जिल्ह्यात दाखल झाले. अंतरवाली सराटी येथे गावातील आंदोलकांची बाळा नांदगावकर यांनी भेट घेतली. जरांगे यांचे आंदोलन वैयक्तिक नाही, असं बाळा नांदगावकर म्हणाले. राज ठाकरे यांनी मनोज जरांगेसोबत फोनवरून संवाद साधला. जरांगे यांच्या लढ्याला आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं राज ठाकरे यांनी म्हंटलं. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९२३ साली मराठ्यांना आरक्षण होतं. ते आता का नाही. मराठ्यांनी कोणतं पाप केलं, असंही नांदगावकर म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जरांगे यांच्याशी चर्चा केली. राज्याच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्या समितीचा अहवाल अद्याप आला नाही. राज ठाकरे म्हणतात, सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही आरक्षण द्यायचे आहे. तर आरक्षण द्यायला अडचण काय. आधीही आरक्षण होते. मग मराठ्यांना आरक्षण द्या. समितीचा अहवाल आला नाही. आंदोलन करणाऱ्यांवर लाठीमार करणं, गोळीबार करणं हे कोणत्या कायद्यात बसते, असा सवाल बाळा नांदगावकर यांनी विचारला. मराठा समाजाने जगाला आदर्श घालून दिला आहे. लाखो लोकांचे मोर्चे निघाले.