राऊतांचा शिंदे गटाला टोला; म्हणाले, शिंदे गट म्हणजे…
राऊत यांनी, तुम्ही तुमच्या पक्षावर बोला. महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न उफाळून वर आले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यावर बोला. मात्र त्यावर न बोलता फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर तोफ डागली जाते
मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तर राज ठाकरे यांच्यासह नारायण राणे, एकनाथ शिंदे आणि भाजपही सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. यावरून शिंदे गटावर संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.
राऊत यांनी, तुम्ही तुमच्या पक्षावर बोला. महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न उफाळून वर आले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यावर बोला. मात्र त्यावर न बोलता फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर तोफ डागली जाते. याचा अर्थ या सगळ्यांना उद्धव ठाकरे यांची धास्ती आणि किती भय आहे हे दिसून येतं. हे मी प्रत्येकाला सांगतोय. महाराष्ट्राचे प्रश्न पाहा. काय उद्धव ठाकरेंवर बोलता तुम्ही. उद्धव ठाकरेंनी सभा घेतली तर लगेच यांचं वऱ्हाड येतं आमच्यापाठोपाठ सभा घ्यायला. त्यामुळे कोण काय बोलतं याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आम्हाला आमची ताकद आणि क्षमता माहीत आहे, असंही ते म्हणाले.