Special Report | इर्शाळवाडीवर दरड कोसळली, राज ठाकरे यांनी दिला होता ‘तो’ इशरा, भाषण व्हायरल…

| Updated on: Jul 22, 2023 | 9:16 AM

इर्शाळवाडीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 22 वर पोहोचला आहे तर 119 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. दुसरीकडे राज ठाकरेंनी 11 जूनच्या भाषणात दरडी कोसळू शकतात, असा इशारा प्रशासनाला दिला होता.

मुंबई, 22 जुलै 2023 | रायगडमधील इर्शाळवाडी गावावर डोंगर कोसळा आणि होत्याचं नव्हतं झालं. आता पर्यंत या दुर्घटनेत 22 जणांचे मृतदेह सापडले असून 119 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. इर्शाळवाडीत दुसऱ्या दिवशीही मदतकार्य सुरुच होतं. दरम्यान या दुर्घटनेवरून मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर हे टाळता आलं असतं, असं अमित ठाकरे म्हणालेत. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी 11जूनलाच दरडीसंदर्भात संभाव्य धोका व्यक्त केला होता. ती क्लीपही आता व्हायरल होतेय. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते, यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jul 22, 2023 09:16 AM
उत्तर भारतीयांचा मेळावा रद्द करत उद्धव ठाकरे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर करणार इर्शाळवाडीचा दौरा
राज्याच्या सत्तेत एकत्र असणाऱ्या भाजप-राष्ट्रवादीच्या मैत्रीला ‘या’ जिल्हापरिषदेत भाजप लावणार सुरूंग?