Eknath Shinde : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे प्रमुख पाहुणे..! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
शिंदे गटाच्या मेळाव्याला मनसे प्रमुख राज ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. त्याअनुशंगाने शिंदे गटाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेना स्थापनेपासून शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परंपरा आहे. यंदा मात्र, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे काय होणार हे पहावे लागणार आहे. शिवसेनेकडूनही याबाबत महापालिकेकडे अर्जही करण्यात आला आहे. त्यामुळे आता शिवतीर्थावर कोणाचा मेळावा होणार आणि यासाठी कोण-कोण उपस्थित राहणार हे पहावे लागणार आहे.
मुंबई : (Shiv Sena’s Dussehra rally) शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत असताना आता वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. यंदा शिंदे गटाचाही दसरा मेळावा होणार आहे. त्याअनुशंगाने (Eknath Shinde) शिंदे गटाने मुंबई महापालिकेकडे शिवतीर्थावरच मेळावा घेण्याची परवानगी मिळावी यासाठी अर्जही केला आहे. एवढेच नाहीतर या शिंदे गटाच्या मेळाव्याला मनसे प्रमुख (Raj Thackeray) राज ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. त्याअनुशंगाने शिंदे गटाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेना स्थापनेपासून शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परंपरा आहे. यंदा मात्र, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे काय होणार हे पहावे लागणार आहे. शिवसेनेकडूनही याबाबत महापालिकेकडे अर्जही करण्यात आला आहे. त्यामुळे आता शिवतीर्थावर कोणाचा मेळावा होणार आणि यासाठी कोण-कोण उपस्थित राहणार हे पहावे लागणार आहे.