Pune Vasant More On Hanuman Mahaarti | मनसेच्या पार्टटाईम पदाधिकाऱ्यांना माझं वेगळेपण खटकतं
पुण्यात झालेल्या या महाआरतीला मुस्लिम बांधवांनीही उपस्थिती लावली, यावेळी त्यांच्याही हस्ते ही महाआरती करण्यात आली आहे. पुण्यातील महाआरतील मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली, त्यांच्या हस्ते आरती केली गेल्यामुळे वसंत मोरे यांचा सर्वधर्म समभाव हा प्रकर्षाने येथे दिसून आला. या त्यांच्या कृतीमुळे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भूमिकेलाच चपराक बसली असल्याचे दिसून आले.
पुणेः राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले. हा मुद्दा चालू असतानाच पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्यावरुनही हे भोंगा प्रकरण अधिकच चर्चेले गेले. त्यानंतर आता पुण्यात मनसे नेते वसंत मोरे यांनी आयोजित केलेल्या कात्रजमधील हनुमानाच्या महाआरतीला (Katraj Mahararati) मनसेप्रमुख राज ठाकरेच गैरहजर राहिले. या कार्यक्रमात राज ठाकरे गैरहजर राहिल्याने आता वसंत मोरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बेबनाव असल्याचेच दिसून येत आहे. तर आझाद मैदानात झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याची भाषा केल्यानंतर त्यांच्या पक्षातली मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी उघड-उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या नाराजीमुळे मनसेकडून त्यांच्यावर टीका सहन करावी लागली होती. या टीकानाट्य नंतर खालकर चौकात झालेल्या महाआरतीला वसंत मोरे गैरहजर राहिले.