धार्मिक पद्धतीच्या अनधिकृत बांधकामांवर मनसे नेत्याची मागणी; म्हणाले, कारवाई होतं राहीली पाहिजे
मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी देखील राज्यातील धार्मिक पद्धतीने असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल गुढीपाडव्यानिमित्त सभा घेतली. यात त्यांनी माहिमच्या दर्गाहचा विषय मांडला. शिंदे-फडणवीस सरकारला इशारा देताच याठिकाणी कारवाई केली. त्यानंतर आता मनसेसह भाजपकडूनही या कारवाईचे समर्थन केले आहे. तर शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अभिनंदन करत सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यानंतर आता मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी देखील राज्यातील धार्मिक पद्धतीने असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सरदेसाई यांनी, सरकार आणि प्रशासनाने यापुढे जबाबदारी घेत अशी अनधिकृत बांधकामे होऊ न देता जी झाली आहेत त्यांच्यावर कारवाई करावी असे म्हटलं आहे. तर अशीच कारवाई होतं राहीली पाहिजे असेही म्हटलं आहे.
Published on: Mar 23, 2023 11:03 AM