“हा हा हा…”, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर राज ठाकरे हसले अन्…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून कोकण दौऱ्यावर आहेत.यावेळी राज ठाकरे यांना ठाकरे बंधू एकत्र येणार का? असं प्रश्न विचारला असता, त्यावर त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.
रत्नागिरी: अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला आहे. राष्ट्रवादीच्या बंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून कोकण दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज ठाकरे ॲक्शन मोडवर आले आहेत. पक्षबांधणी करण्यासाठी ते कौकण दौऱ्यावर गेले आहेत.काल त्यांनी रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांना ठाकरे बंधू एकत्र येणार का? असं प्रश्न विचारला असता, त्यावर त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे या प्रश्नावर हसत पुढे निघून गेले.
Published on: Jul 14, 2023 09:56 AM