‘लाडकी बहीण योजना फार तर…,’ काय म्हणाले राज ठाकरे
राज ठाकरे यांनी नागपूरात झालेल्या पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजना फार काळ चालणार नसल्याचे संकेत दिले. यावेळी त्यांनी अजितदादांचा आवाजाची नक्कल देखील केली.
राज्य सरकारने महिलांना 1500 रुपयांचा दर महिन्याला हप्ता देणारी योजना जरी जाहीर केली असली तर राज्य सरकारकडे गी योजना चालवायला पैसे तरी असायला नको का ? ही योजना फार तर एक दोन महिने चालवतील असे भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. त्यानंतर पैसा अभावी ही योजना बंद होईल असेच भविष्य या योजनेचे असेल असेही ते म्हणाले. राज ठाकरे यांना नागपूर दौऱ्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी विविध विषयांवर पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तरे दिली. या योजनेला चालविण्यासाठी दरवर्षी 46 हजार कोटीची गरज लागणार असल्याचे राज्य सरकारनेच म्हटले आहे.
Published on: Aug 24, 2024 03:06 PM