Raj Thackeray PC | महाराष्ट्रात कोरोना का वाढतोय? राज ठाकरेंनी सांगितली दोन कारणे
Raj Thackeray Press Conference

Raj Thackeray PC | महाराष्ट्रात कोरोना का वाढतोय? राज ठाकरेंनी सांगितली दोन कारणे

| Updated on: Apr 06, 2021 | 12:43 PM

बाहेरच्या राज्यातून येणारी माणसं आणि त्यांची न झालेली चाचणी यामुळे कोरोना वाढला. तसेच इतर राज्यात कोरोना रुग्णांची चाचणीच केली जात नाहीत. त्यामुळे त्या राज्यात किती रुग्ण आहेत याचे आकडेच येत नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाची टेस्टिंग केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे आकडे बाहेर येतात, असं राज म्हणाले. राज्यात परत येणाऱ्या बाहेरच्या लोकांची मोजणी करावी आणि त्यांची चाचणी करावी अशी सूचना मी केली होती. परंतु, त्याकडे लक्ष दिलं नाही. कुणाचीही मोजणी आणि चाचणी केली नाही. त्यामुळे ही संख्या वाढली आहे. कोण येतंय कोण जातंय हे कुणालाच माहीत नव्हतं. आज कोरोना आहे, उद्या आणखी काही असेल. हे दुष्टचक्र न थांबणारं आहे, असंही ते म्हणाले.

Raj Thackeray PC | मुख्यमंत्री स्वत: क्वारंटाईन, त्यामुळे फोनवरच आमची चर्चा
Raj Thackeray PC Live | मनसेचे जमील शेख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी नेत्याचं नाव समोर : राज ठाकरे