‘मोठ्याने घोषणा केली म्हणजे तुम्हाला…,’ काय म्हणाले राज ठाकरे

| Updated on: Jul 25, 2024 | 2:27 PM

राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. विधानसभा निवडणूकांचे रणशिंग या मेळाव्यात त्यांनी फुंकले. ते म्हणाले की ही माहिती देण्यासाठी मी तुम्हाला बोलावलं आहे. पावसामुळे जे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष कोणी आले नसतील त्यांना टीम फोन करेल आणि कधी येणार हे सांगेल.एक दोन दिवसातच ते तुमच्याकडे येतील. त्यानंतर तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा असाही आदेश राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

Follow us on

मनसे कार्यकर्त्यांचा मेळाव्यात आज राज ठाकरे यांनी विधान सभा निवडणूकांचे रणशिंग फुंकले आहे. निवडणूकांचे सर्वे वगैरे काही येऊ देत. हे सर्वे कसे घेतले जातात. ते कोणाल फोन करता सगळं काय असते हे सर्वांना माहिती आहे. कोणी काही म्हणो. आपल्या हसू देत परंतू तुम्ही मला काहीही करुन सत्तेत पाहीजेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत आपण 225-250 पर्यंत जागा लढवू अशी घोषणा राज ठाकरे यांनी यावेळी केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात नेहमीच्या शैलीत घोषणाबाजी केली. यावेळी राज लागलीच म्हणाले की तुम्ही मोठ्याने घोषणा केली म्हणजे तुमची वर्णी लागेल असं समजू नका. मी सर्व गोष्टी चेक करणार. त्यामुळे आपली पक्षाची टीम येईल, तुम्हाला फोन करेल. तुमच्या बोलतील. त्यानंतर माझ्याकडे सर्व्हे येईल असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पावसापाण्याचा विचार करून आपण १ ऑगस्टपासून राज्याचा दौरा सुरू करतोय अशी घोषणा राज ठाकरे यांनी यावेळी केली. मी राज्यात तालुक्यात जिल्ह्यात येईल. तिथे तुमची भेट होईल. जिथे कुणाच्या भेटी करायच्या आहेत असं वाटतं त्यांच्याशी मी भेट घेईल, मेळावे घ्यावेत न घ्यावेत हे पाऊस पाहून ठरवू.पण तुमच्यासोबत बैठक घेणार आहे असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.