Raj Thackeray : ‘हा विषय फक्त खंडणीला विरोध केल्याचा होता, पण..’; देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray On Santosh Deshmukh Case : मनसेच्या पाडवा मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील भाष्य केलं आहे.
संतोष देशमुख यांना अतिशय घाणेरड्या पद्धतीने मारलं गेलं, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे. काल झालेल्या मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केलं. केवळ खंडणीला विरोध करण्याचा विषय होता, मात्र वंजाऱ्याने मराठ्याला मारलं असं लेबल लावलं गेलं असल्याचं देखील राज ठाकरे म्हणाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा हा केवळ खंडणीचा होता. खंडणीला विरोध केला म्हणून झालेला हा प्रकार आहे. अतिशय घाणेरड्या पद्धतीने संतोष देशमुख यांना मारण्यात आलं. उद्या तिथे संतोष देशमुख यांच्या जागी दुसरं कोणीही असतं तरीही आरोपींनी हेच केलं असतं. मात्र हा मुद्दा जातीचा बनवला गेला, असं राज ठाकरेंनी म्हंटलं.
Published on: Mar 31, 2025 12:56 PM