Special Report | 5 वर्षांपूर्वी बोलले, आज खरं ठरलं?-tv9

| Updated on: Apr 19, 2022 | 10:13 PM

राज ठाकरेंनी काढलेल्या एका जुन्या व्यंगचित्राची शिवसैनिकांना आठवण झालीय...निमित्त ठरलंय राज ठाकरेंचा नियोजीत अयोध्या दौरा. ३ वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन एक व्यंगचित्र काढलं होतं. त्याच व्यंगचित्रावरुन शिवसेना-मनसेत सवाल-जवाब रंगतायत. 3 वर्षांपूर्वी राज ठाकरेंचं काय मत होतं, त्याचं पोस्टर शिवसेनेकडून लावलं गेलं.

राज ठाकरेंनी काढलेल्या एका जुन्या व्यंगचित्राची शिवसैनिकांना आठवण झालीय…निमित्त ठरलंय राज ठाकरेंचा नियोजीत अयोध्या दौरा. ३ वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन एक व्यंगचित्र काढलं होतं. त्याच व्यंगचित्रावरुन शिवसेना-मनसेत सवाल-जवाब रंगतायत. 3 वर्षांपूर्वी राज ठाकरेंचं काय मत होतं, त्याचं पोस्टर शिवसेनेकडून लावलं गेलं. याआधी जेव्हा शिवसेना-भाजपात वितुष्ट होतं, तेव्हा उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा केला होता. त्यावेळी राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र काढलं होतं. ज्यात एकीकडे राम लक्ष्मण दगडावर बसले होते. दुसरीकडे भाजप, विश्व हिंदू परिषद आणि उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाली होती. त्यावेळी नेत्यांचे अयोध्या दौरे पाहून रामाच्या मनातला भावना राज ठाकरेंनी व्यक्त केल्या होत्या. अहो देश घातलात खड्ड्यात. आणि आता माझ्या नावाने गळा काढत आहात! अरे, लोकांनी तुमच्याकडे ‘रामराज्य’ मागितले होते, ‘राममंदिर’ नव्हे! आज नेमकं याच्याउलट चित्र आहे.

Special Report | आमदार यादीतून Eknath Khadse, Urmila Matondkar आणि Sachin Sawant यांचा पत्ता कट?-tv9
Special Report | श्रमिकांच्या वकिलाची ‘श्रीमंती’ चर्चेत-tv9