आजोबा… नातवाचा पहिला दोस्त; कियानला घेवून राज ठाकरे शिवाजी पार्कात
राज ठाकरे नातू कियानसह शिवाजी पार्कवर फेरफटका मारताना दिसले.
मुंबई : आजोबा… नातवाचा पहिला दोस्त. मनसे प्रमुख राज ठाकरे हे सध्या आजोबाच्या भुमिकेत दिसत आहेत. राज ठाकरे नातू कियानसह शिवाजी पार्कवर फेरफटका मारताना दिसले. नातवाला कडेवर घेऊन राज ठाकरेंनी पार्काची सैर केली. छोट्याशा कियानला राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात फिरवले.
नातवाला घेऊन आजोबा राज ठाकरे आणि आजी शर्मिला ठाकरे थोडा वेळ शिवाजी पार्कवरच्या कट्ट्यावरही बसले होते. यावेळी राज ठाकरेंना आणि त्यांचा नातवाला पाहायला गर्दी देखील जमली होती.
कियान या अमित ठाकरे यांचा मुलगा आहे. सध्या राज ठाकरे नातू कियानसाठी वेळ काढत आहेत. ते त्याच्यासह खेळत तसेच त्याला बाहेर फिरायला देखील नेत आहेत.