Special Report | यूपीच्या पैलवानामागे खरा ‘वस्ताद’ कोण ?
जर बृजभूषण सिंहांमागे शरद पवारांचा हात असेल, तर मग योगी सरकार मनसैनिकांवर गुन्हे दाखल करणार होतं, हा आरोप राज ठाकरेंनी का केला?जर बृजभूषण सिंहांना शरद पवारांनी रसद पुरवली असेल, तर मग मी भाजपचंच काम करतोय,असं बृजभूषण सिंह का म्हणाले? असेही प्रश्न मनसे नेते विचारत आहेत.
मुंबई : एक साधा खासदार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना (Yogi Adityanath) आव्हान देतो, हे शक्य आहे का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी 2 दिवसांपूर्वी पुण्यात घेतलेल्या सभेत केला होता. मात्र, राज यांनी शक्यता व्यक्त केली असली तरी त्यामागचे चेहरे सांगितले नाही. ते चेहरे कोण आहेत, हे मला माहिती असूनही बोलता येणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते. तर उत्तर प्रदेश चे खासदार बृजभूषण सिंह हे फक्त एप मोहरे आहेत. त्यांच्या मागे दुसऱ्याचेच हात असल्याचेही बोलले जात आहे. त्यानंतर आता या खासदार असणाऱ्या पैलवानाचा वस्ताद हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)असल्याचा दावा मनसेचे नेते करत आहेत. यावेळी पहिल्यांदाच मनसेची भूमिका राज ठाकरेंऐवजी त्यांचे नेते मांडत आहेत. तर दुसरीकडे संशयाची सुई भाजपकडे देखील फिरवली जात आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उभे होताना दिसत आहेत. त्याबद्दल हा स्पेशल रिपोर्ट…