Mumbra | Raj Thackeray यांच्या वाढदिवसाचे बॅनर अज्ञातांनी फाडले
इरफान सय्यद या मनसे कार्यकर्त्याने लावण्यात आलेल्या बॅनरबाबत मुंब्रा पोलिसात तक्रार करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा हा प्रकार झाल्याने मनसे नेते आणि पदाधिकारी याबाबत काय पाऊल उचलणार हे पाहणे गरजेचे आहे.
ठाणे : मुंब्रा परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर अज्ञात लोकांनी फाडले. या अगोदर देखील मनसे कार्यालयावर दगडफेक करून बॅनर फाडले होते. इरफान सय्यद या मनसे कार्यकर्त्याने लावण्यात आलेल्या बॅनरबाबत मुंब्रा पोलिसात तक्रार करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा हा प्रकार झाल्याने मनसे नेते आणि पदाधिकारी याबाबत काय पाऊल उचलणार हे पाहणे गरजेचे आहे. मुंब्रा परिसरातील नुराणी हॉटेलसमोर लावलेले बॅनर फाडण्यात आले आहेत.
Published on: Jun 14, 2022 01:23 AM