उद्या औरंगाबादेत राज ठाकरेंची सभा, मनसेचे बडे नेते औरंगाबादच्या दिशेने रवाना

| Updated on: Apr 30, 2022 | 9:28 AM

उद्या राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेचे बडे नेते औरंगाबादमध्ये दाखल होत असल्याचे पहायला मिळत आहे. आज दुपारी संदीप देशपांडे आणि राजू पाटील देखील औरंगाबादमध्ये येणार आहेत.

उद्या एक मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेची सध्या जय्यत तयारी सुरू असून, तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या जवळपास सर्वच मोठ्या नेत्यांचा तळ औरंगाबादमध्ये पहायला मिळणार आहे.  मनसे नेते संदीप देशपांडे आणि राजू पाटील आज दुपारी औरंगाबादमध्ये दाखल होणार आहेत. तर अमित ठाकरे त्याआधीच औरंगाबादमध्ये पोहोचले आहेत. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Special Report |…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची गाडी फोडली असती
2 मे रोजी राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर; अनंता सूर्यवंशींच्या कुटुंबीयांची भेट घेणार?