पुण्यात आज राज ठाकरेंची सभा
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडणार आहे. आज राज ठाकरे यांच्या निशाण्यावर कोण असणार यांची उत्सुकता निर्माण झाली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा होणार आहे. सभेला दहा वाजता सुरुवात होईल. गेल्या काही सभांमध्ये राज ठाकरे मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका देखील केली. राज्य ठाकरे यांनी आपल्या खास शैलित विरोधकांचा समचार घेतला. दरम्यान पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे यांच्या निशाण्यावर कोण असणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
Published on: May 22, 2022 09:18 AM