ढोल ताशे, सेल्फी वाल्यांची गर्दी, राज ठाकरेंच्या दौऱ्याचा श्रीगणेशा!
फुलांचा बुके देऊन, ढोल ताशे वाजवून त्यांचं स्वागत केलं गेलंय. यावेळी सेल्फी काढणाऱ्यांची सुद्धा गर्दी पाहायला मिळालीये. आज राज ठाकरे नागपुरातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत.
नागपूर: राज ठाकरेंचं ढोल ताशांच्या गजरात नागपूर रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आलंय. यावेळी प्रचंड गर्दी पाहायला मिळालीये. मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय. फुलांचा बुके देऊन, ढोल ताशे वाजवून त्यांचं स्वागत केलं गेलंय. यावेळी सेल्फी काढणाऱ्यांची सुद्धा गर्दी पाहायला मिळालीये. आज राज ठाकरे नागपुरातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. त्यांचा हा विदर्भ दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. वेगवेगळ्या जिल्ह्यांना, इथल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना ते भेटणार आहेत. ५ दिवस, २२ सप्टेंबर पर्यंत हा दौरा असणारे. दरम्यान मुंबई ते नागपूर असा प्रवास करून ते नागपुरात दाखल झालेत.