“उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील”, माजी आमदाराचा मोठा दावा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्थन दर्शवण्यासाठी "एक सही अजितदादांसाठी..माझी सही विकासासाठी " हा राज्यातला पहिला अभिनव उपक्रम सोलापूर राबविला जात आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या पुढाकारातून हा अभिनव राबवण्यात आला आहे. यावेळी राजन पाटील यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाबाबात मोठं विधान केलं आहे.
सोलापूर, 02 ऑगस्ट 2023 | उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. त्याचं कारण असं की, सोलापूरमधील मोहोळ विधानसभा मतदार संघातील अनगरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्थन दर्शवण्यासाठी “एक सही अजितदादांसाठी..माझी सही विकासासाठी ” हा राज्यातला पहिला अभिनव उपक्रम राबविला जात आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या पुढाकारातून हा अभिनव राबवण्यात आला आहे. यावेळी राजन पाटील यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाबाबात मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, “राज्याला गतिमान करण्यासाठी येत्या काळात अजित पवारच मुख्यमंत्री होतील. अजित पवारच मुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावेत ही राज्यातील जनतेची मागील 20 वर्षांपूर्वीपासूनची इच्छा आहे. विकासाचे व्हीजन घेऊन जाणारे नेतृत्व अजित पवारांमध्ये असल्यामुळे ते मुख्यमंत्री झालेले जनतेला आवडतील.मुख्यमंत्री पदासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा असुन त्यांना मोहोळ मतदारसंघाचा पाठिंबा आहे.राज्याला पुढे नेण्याचं काम पवार कुटूंब करत आहे. विकास कामे करण्यासाठीच अजित पवार सत्तेत सहभागी झालेत.”